Breaking

तलाठी (Village officer)

 


तलाठी (Village officer)

महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ७(३) नुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक गावासाठी १ किंवा अधिक तलाठी नेमण्याचे अधिकार आहेत. 

१) निवड : महाराष्ट्र अधिनियम १९६६ अन्वये जिल्हाधिकाऱ्याकडून नेमणूक. कलम ७(३) 

२) पात्रता : राज्य शासनाने ठरविल्याप्रमाणे तलाठीपदासाठी जिल्हा निवड मंडळ (पूर्वी प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ) यांच्यातर्फे निवड केली जाते. नियंत्रण : तहसीलदार, बडतर्फी : उप-जिल्हाधिकारी 

३) कार्ये

१) जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी ठरवून दिलेली नोंदणी पुस्तके, हिशेब, अभिलेख ठेवणे. 

२) तहसीलदार, महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, यांच्या आदेशानुसार नोटिसा, मरणोत्तर चौकशीचे प्रतिवृत्त, फौजदारी प्रकरणातील जबानी व तपासणी इ. 

३) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये इतर वरिष्ठ महसूल अधिकारी सोपवतील अशी कर्तव्ये व कामे पार पाडणे. 

४) निवडणूक यंत्रणेतील कामे पार पाडणे. 

५) महसूल, वसुली, तगाई/कर्जे यांची वसुली, गावाच्या नोंदीचे उतारे देणे, दुष्काळ निवारण, कुटुंबनियोजन कार्यक्रमांतर्गत सोपविलेली कामे पार पाडणे. 

६) जमीन महसूल थकबाकी व जमिनीच्या अधिकारपत्राची नोंद ठेवणे. 

 ७) पीकपाण्याची नोंद करणे. सातबारा, ८ अ उतारा देणे.)

८) साथीच्या रोगांची माहिती आरोग्य अधिकार्यांकडे पाठविणे. 

९) आपद्ग्रस्त व निराधार कुटुंबाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविणे. 

१०) जमिनीची पैसेवारी ठरवणे, त्याचा अहवाल तहसीलदारांमार्फत शासनास पाठविणे, 

११) गावातील कायदा व सुव्यवस्थेनिमित्त येणाऱ्या कागदपत्रांच्या नोंदणी करणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking