Breaking

कोतवाल (KOTWAL)

 कोतवाल (KOTWAL)

 कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतात. पूर्वीच्या वतनी कनिष्ठ ग्रामनोकराच्या जागी सध्या पूर्णवेळ काम करणारा 'कोतवाल' हा २४ तास शासकीय सेवेचे आवश्यकते प्रमाणे काम करीत असतो. कोतवालांची संख्या गाव लोकसंख्येवर अवलंबून असते. संबंधित जिल्हाधिकाऱ्यास आवश्यक वाटल्यास ३ पेक्षा अधिक कोतवालांची नेमणूक करताना राज्य सरकारची पूर्वसंमती घ्यावी लागते. गावाची 

१) गावची लोकसंख्या जर १००० पर्यंत असेल तर एक कोतवाल 

२) गावची लोकसंख्या जर १००० ते २००० असेल तर दोन कोतवाल

३) गावची लोकसंख्या  जर ३००० ते पुढे तर ३ कोतवाल नेमनुक करता येते.

 पात्रता

१) कुळकायद्याप्रमाणे विषद केलेल्यापेक्षा जास्त जमीन कोतवालाने मालक, कूळ/मालक व कूळ या दोन्ही नात्याने मिळून धारण केली नसावी. 

२) १८-४० वयोगट. 

३) शारीरिकदृष्ट्या सक्षम. 

४) चारित्र्य व वर्तनुक चांगली.

५) विहित तारण रक्कम रु. १०० व टोन जामीन द्यावे लागतात. कोतवालाने संबंधित गावात राहणे आवश्यक असते. पूर्वीच्या वतनदार कनिष्ठ नोकरांना प्राधान्य द्यावे. देखरेख व नियंत्रणाचे अधिकार तलाठ्यास आहेत. कायदा व सुव्यवस्था कोतवालाच्या कामाचे देखरेख अधिकार पोलीस पाटलास आहेत. 

रजा : नियम शासकीय सेवकाप्रमाणे. १५ दिवस किरकोळ रजा, ११ दिवसासाठी १ अर्जित रजा. किरकोळ रजा मंजुरीचे अधिकार तलाठ्यास व अर्जित रजा मंजुरीचे अधिकार तहसीलदारास आहेत. मासिक वेतन : रु. २०००. निलंबन : तहसीलदार. त्याच्या रजेच्या काळात शेजारच्या गावातील कोतवाल कामकाज पाहतो. कोतवालावर जवळचे नियंत्रण तलाठी करतो.

  कार्य

१) गावकऱ्यांना आवश्यक तेव्हा चावडी/ सजा येथे बोलाविणे. 

२) गावाचे दफ्तर वरिष्ठ कार्यालयात नेणे व आणणे. 

३) पत्रव्यवहार पोच करणे. 

४) जन्म, मृत्यू विवाह इ. नोंदणीची माहिती ग्रामसेवकास देणे. 

५) बवंडी पिटून सरकारी सूचना, आदेश जाहीर करणे. 

६) पोलीस पाटलाच्या रखवालीतील कैद्यांवर पहारा ठेवणे 

७) तलाठी, पोलीस पाटील यांच्यावरील अधिकाऱ्यांच्या कामात मदत करणे, 

८) तलाठी कार्यालय, चावडी येथे स्वच्छता ठेवणे. 

९) गुन्ह्यासंबंधी माहिती पोलीस पाटलास कळवणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking