Breaking

महाराष्ट्र पोलीस खात्याची संरचना (Structure of Maharashtra Police Department)

 


महाराष्ट्र पोलीस खात्याची संरचना 

- पोलीस महासंचालक(DGP) 

- अतिरिक्त महासंचालक ( १७ पदे) 

- विशेष पोलीस महानिरीक्षक (special IGP महसूल आयुक्ताच्या    दर्जाचे पद) 

- पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) 

- सहाय्यक महानिरीक्षक (AIG) 

- पोलीस अधिक्षक (SP/DCP) 

- अतिरिक्त पोलीस अधीक्षक (Add. SP) 

- पोलीस उपअधीक्षक (DySP/ACP)

 - वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr. PI) 

- पोलीस निरीक्षक (PI) 

- पोलीस उपनिरीक्षक (PSI) 

- सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) 

- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (APSI) 

- पोलीस हवालदार (Head Constable) 

- पोलीस नाईक (Police Naik) 

- पोलीस शिपाई (PC)


जिल्हा पोलीस अधीक्षक : महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षकव त्याच्या मदतीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक असतात, जिल्ह्याची उपविभागात विभागणी करण्यात येऊन त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी, त्यांच्या खाली पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्यांवर निरीक्षक किंवा उपनिरीक्षक अशी खालपर्यंत क्रमशः रचना असते. जरूर तेथे दूरक्षेत्रे (आउटपोस्ट) असून त्यावर प्रमुख शिपायांच्या (हेड कॉन्स्टेबल) नेमणुका केल्या जातात. जिल्ह्यात २० ते ३० पोलीस ठाणी असतात. गुन्हाअन्वेषण, गुप्तवार्ता, स्त्री-पोलीस इ. शाखा जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. मुख्यालयात् सुमारे ४०० ते १ हजार हत्यारी पोलीस शिपाई असतात. कैदी नेणे-आणणे, सरकारी कोषागारांची तसेच मालमत्तेची सुरक्षितता, कारागृहांवर पहारा इ. कामे हत्यारी पोलिसांना करावी लागतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking