Breaking

सामान्य ज्ञान भाग - 7

 




सामान्य विज्ञान इयत्ता आठवी

५९. युरेनिअमच्या अणूंवर न्यूट्रॉन्सचा मारा केल्यास त्यातून अणुऊर्जा मिळते. 

६०.महाराष्ट्रात तारापूर येथे तर गुजरातमध्ये काकरापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्प आहे. 

६१. साधा विद्युत घट - यामध्ये जस्ताची पट्टी ऋण धुव तर तांब्याची पट्टी धन ध्रुव म्हणून काम करते. 

६२. लेकलशे विद्युतघट-यामध्ये मँगनीज डायॉक्साईड आणि कार्बन यांचे मिश्रण धन ध्रुव म्हणून वापरले जाते तर जस्ताची दांडी घटाचा ऋण ध्रुव असतो. 

६३. कोरडा विद्युतघट - जस्ताचे आवरण म्हणजे ऋण धुव तर कार्बन कांडी धन ध्रुव 

६४. निकेल - कॅडमिअम घट - कॅडमिअम हा ऋण ध्रुव तर निकेल हा धन ध्रुव. 

६५. बटन सेल - लिथियम आयर्न फॉस्फेट ऋण ध्रुव तर कार्बन हा धन धुव. 

६६. एकाहून अधिक विद्युतघट जोडले, तर त्या जोडणीला बॅटरी म्हणतात. 

६७. बर्फाचा द्रवणांक 0° से., तर लोखंडाचा १५३५° से. इतका आहे. ६८. खनिज तेलातून घटक पदार्थ प्रभाजी उध्ध्वपातनाने वेगळे करतात. यापैकी पेट्रोल हे अत्यंत ज्वालाग्राही असून त्याचा उत्कलनांक सगळ्यात कमी असतो. त्यानंतर नॅप्था, केरोसीन, डिझेल असा क्रम लागतो. ६९. प्लॅटिनम, सोने हे धातू तन्य म्हणून प्रसिद्ध आहेत. 

७०. १.२७ ग्रॅम प्लॅटिनमची २.५ किमी तार काढण्यात आली. 

७१. हवा, पाणी, आम्ल, उष्णता यांचा परिणाम होत नाही, म्हणून प्लॅटिनम व सोने यांना राजधातू म्हणतात. 

७२. सोने आणि प्लॅटिनम अलंकार बनवण्यासाठी वापरतात. 

७३. सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजत असतात. २४ कॅरेट म्हणजे शुद्ध सोने होय. दागिने तयार करण्यासाठी साधारणपणे २२ कॅरेट सोने वापरतात. 

७४. लोखंड, क्रोमिअम, निकेल यांपासून स्टेनलेस स्टील तयार होते. ७५. कार्बन हे अधातू मूलद्रव्य आहे. ते निसर्गात हिरा आणि ग्रॅफाइट या मुक्त स्वरुपात तसेच संयुगात आढळते. 

७६. कोळश्याचे प्रकार व त्यातील कार्बनची टक्केवारी पुढीलप्रमाणे-

कोळशाचे प्रकार -

 *अॅथ्रासाईट- कार्बनची टक्केवारी ८० %

* बिटुमिनस -कार्बनची टक्केवारी ६० %

* लिग्नाइट -कार्बनची टक्केवारी २२ %

* पीट - कार्बनची टक्केवारी ११ %

७७. स्फटिक रुपांत हिरा, मँफाईट, फुलेरिन्स आढळतात. 

७८. तेजस्वी, शुद्ध हिरा अतिशय कठिण पदार्थ असून तो विद्युत दुर्वाहक आहे. 

७९. फुलेरिन्स हे नव्याने माहिती झालेली कार्बनचे एक बहुरुप आहे. ८०. बकीबॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या C(60) या प्रकारात कार्यनचे अणू पंचकोनी आणि षटकोनी मांडणीच्या रुपात एकमेकांशी जोडलेले असतात. 

८१. वरील शोधासाठी १९९६ चे रसायन शास्वराचे नोबेल पारितोषिक हॅरॉल्ड क्रोटो, रॉबर्ट कर्ल आणि रिचर्ड स्मॉली यांना देण्यात आले. 

८२. कार्बम कोणत्याही द्वावणात विरघळत नाही. 

८३. ऑक्सिजन स्वतः जळत नाही परंतु ज्वलनाला मदत करतो. 

८४. वेल्डिंगची कामे करण्यासाठी ऑक्सिहायड्रोजन (२८००°C तापमान) किंवा ऑक्सिअंसिटीलीन (३३००°C तापमान) या मिश्र ज्योतीचा वापर करतात. 

८५. कार्बनडायॉक्साईड ५७°C पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रुपात जातो. तेव्हा त्याला शुष्क-कोरडा बर्फ म्हणतात. 

८६. अरगॉनचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये, हेलिअमच्या कमी तापमान मिळविण्यासाठी तर निऑनचा उपयोग जाहीरातीसाठीच्या दिव्यात करतात. 

८७. खडकांचे मातीत रुपांतर होण्याच्या क्रियेला 'अपक्षीणन' म्हणतात. 

८८. सुपीक जमीनीचा २.५ सेमी जाडीचा मातीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यास ८०० ते १००० वर्षे लागतात. 

८९. चीन देशातील काऊलिंग नावाच्या टेकडीजवळ मिळणाऱ्या मातीला चिनीमाती किंवा के ओलिन म्हणतात. 

९०. चिकणमाती, शाडूची माती हे केओलीनचे प्रकार आहेत. 

९१. १९७६ साली भारत सरकारने सामाजिक वनीकरणाची सुरुवात केली. 

९२. रानभेंडी, शिरीष, जट्रोपा यांची इंधनशेती केली जाते.

 ९३. तांदूळ साठविताना दाण्यावरील टरफल काढले जात नाही. 

९४. सजीवांच्या पेशी किंवा पेशीसमूहाची कृत्रिम पद्धतीने वाढ करणे याला टिश्यू कल्चर म्हणतात. ९५. टिश्यू कंल्चर म्हणजे सूक्ष्मरुपात केलेले पुनरुत्पादन होय. 

९६. प्राण्याच्या वजनाच्या दोन ते अडीच टक्के इतका कोरडा आहार आवश्यक असतो. 

९७. मेंढीच्या मलमूत्रात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशचे प्रमाण इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक असते. 

९८. अंडी देणाऱ्या कोंबड्यांना लेअर्स कोंबड्या म्हणतात, तर मांस मिळविण्यासाठी वाढवलेल्या कोंबड्यांना ब्रॉयलर कोंबड्या म्हणतात. 

९९. समुद्रात आढळणाऱ्या ऑयस्टर प्राण्यांपासून मोती मिळतात. 

१००. आकर्षक लाल रंगाची लाख ही लाखेच्या किङ्यांनी स्त्रवलेला एक पदार्थ आहे. 

१०१. तुतीची पाने खाणाऱ्या किङ्यांपासून तलम रेशीम मिळते, तर ऐनाची पाने खाणाऱ्या किड्यापासून मजबूत रेशीम मिळते. त्याला टसर रेशीम म्हणतात. 

१०२. गोड्या पाण्यात कटला, रोहू, मृगळ, कार्प तर खाऱ्या पाण्यात बोटा, रेणवी, चॅनॉस, खसी जातीच्या माशांची पैदास होते. 

१०३. युग्लिना हा सजीव वनस्पती व प्राणी या दोन्ही बगतील आहे. 

१०४. १ ग्रॅम सोने ठोकून दोन मीटर क्षेत्रफळाचा पत्रा तयार होतो. 

१०५. शंभर वर्षा पूर्वी हवेतील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण ०.०२९ प्रति शेकडा होते. आज ते ०.०३५ इतके झाले आहे. 

१०६. टेराकोटा ही माती आहे. कुंड्या आणि चित्रे बनविण्यासाठी तिचा वापर करतात.

समोरिल पोस्ट लवकरच घेऊन येत आहोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking