Breaking

सामान्य ज्ञान भाग - 8


 विज्ञान आणि तंञज्ञान class 9

१. सर्व वस्तू द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापते त्याला द्रव्य म्हणतात. 

२. द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायू हे प्रकार आहेत तर रासायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत. 

३. अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असतांना असते.

४. अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्या गेल्यावरसुध्दा कायम असतो ठराविक आकार व आकारमान असणाऱ्या स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) म्हणतात. 

५. ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायू धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येतात. 

६. स्थायूंमध्ये आंतररेण्वीय बल अतिशय प्रभावी असते. 

७. द्रवांमधील आतंररेण्वीय बल मध्यम असते तर वायूंमध्ये आंतर रेण्वीय बल क्षीण असते.

 ८.अलीकडील काळात विज्ञानामध्ये रासायनिक पदार्थ या ऐवजी 'पदार्थ' हा शब्द प्रयोग करतात. 

९. आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझिए ने मूलद्रव्याची व्याख्या मांडली आहे.

१०. दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनवलेला पदार्थ म्हणजे संयुग. 

११. लॅव्हाझिएने ऑक्सिजनचा शोध व नामकरण केले. 

१२. लोह व गंधक तापल्यावर एक नविन पदार्थ तयार होउन त्याला आयर्न सल्फाईड असे म्हनतात.

१३. दूध हे पाणी,दुग्धशर्करा,स्निग्ध पदार्थ व प्रथिने, इतर अशा काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण असते.

१४. मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू व अधातू व धातुसदृश असे करतात.

१५. सुमारे ऐंशी मुलद्रव्ये धातू आहेत. १६. सिलिकॉन, सेलेनियम, असेंनिक ही धातुसदृशांची काही उदाहरणे आहेत. 

१७. एक द्रव आणि एक अथवा अधिक स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन असे संबोधतात.

१८. विषमांगी मिश्रणांना कलिले म्हणतात. कलिल कणांचा व्यास १० m च्या आसपास असतो तर निलंबनातील स्थायू कणांचा व्यास १०- m पेक्षा जास्त असतो. 

१९. पचन विकार यावर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे एक कलिल आहे. 

२०. द्रावणाच्या एक एकक एवढ्या आकारमानात विरघळलेल्या द्राव्याच्या वस्तुमानाला द्रावणाची संहती असे म्हणतात. 

२१. इ.स. १८०८ मध्ये इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन याने त्याचा प्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. 

२२. द्रव्य हे अणूंचे बनलेले असते. अणू द्रव्याचे अविभाजनीय लहानात लहान कण आहेत.

२३. अणूंच्या संयोगातून रेणू तयार होत असतात.

२४. इ.स. १८९७ मध्ये जे. जे. थॉमसन या इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या अणूहून १८०० पट हलक्या करणाचा शोध लावला. 

२५. सन १९१३ मध्ये डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अणुप्रारुप मांडले. 

२६. सन १९३२ मध्ये चॅडविक या वैज्ञानिकाने न्यूटरॉनचे अस्तित्व दाखवून दिले. 

२७. सन १९२६ मध्ये मांडल्या गेलेल्या पुजयांत्रिकी या नव्या सिद्धांतामध्ये अणूच्या संरचनेचे वर्णन दुसऱ्या पद्धतीने करण्यात आले. 

२८. अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात. त्यांना एकत्रितपणे न्युक्लिओन म्हणतात, प्रोटॉन व न्यूट्रॉन हे त्याचे दोन प्रकार आहेत. 

२९. केंद्रकाबाहेरील भाग हा ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा बनलेला असतो.

 ३०. केंद्रकाबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढाच असल्यामुळे अणू हा विद्युतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो. 

३१. पूर्वी अणूत्रिज्येसाठी अँगस्ट्रॉम (A° %3D 10* cm) हे एकक वापरात होते. आता अॅगस्ट्रॉमच्या जागी पिकोमीटर (pm) हे एकक वापरात आहे. (1 pm = 10-12 m) ३२. अणूवस्तूमानांक दर्शविण्यासाठी खोस असे अणुवस्तूमान एकक डाल्टन वापरले जाते. (u) 

३३. इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित मूलकण असून त्याचा निर्देश असा करतात. 

३४. इलेक्ट्रॉन चे वस्तूमान 0.00054859 u आहे. 

३५. प्रोटॉन हा धनप्रभारित मूलकण असून त्याचा निर्देश P ह्या संज्ञेने करतात. 

३६. न्यूट्रॉन हे विद्युतप्रभारदृष्ट्या तटस्थ असलेले मूलकण आहेत.

३८. KLMN या या कवचामध्ये २, ८, १८, ३२ पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकत नाहीत. मात्र कोणत्याही अणूच्या शेवटच्या म्हणजेच सर्वात बाहेरील कवचामध्ये जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन सामावू शकतात. 

३९. K कवचातील इलेक्ट्रॉनची उर्जा कमी असते. 

४०. हेलिअम, निऑन यांसारखी काही थोडी मूलद्रव्ये कोणत्याही अणूबरोबर संयोग न पावता मुक्त अशा अणुस्थिती मध्येच अस्तित्वात असतात. 

४१. अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा असे म्हणतात. 

४२. संयुजा हा अणूचा मूलभूत रासायनिक गुणधर्म आहे. 

४३. अणूच्या बाह्यतम कवचाला त्याचे संयुजा कवच असे म्हणतात. 

४४. ज्यांचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूची संयुजा शून्य असते. 

४५. बारा न्युक्लिऑन असलेल्या कार्बन अणूचे जे वस्तुमान त्याच्या १/१२ एवढे वस्तुमान म्हणजे एक अणुवस्तुमान एकक (a.m.u.) होय.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking