KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र / यात्रास्थळ विकास योजना • ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना पायाभुत स...

बोधकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बोधकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जून ०७, २०२१

परिश्रम

                            परिश्रम 



        परिश्रम जीवनाचे अमृत आहे. विद्या, यश, संपत्ती, कीर्ती सर्व परिश्रमानेच प्राप्त होते. एकदा सम्राट हदरियन आपल्या सेनेसह स्वारीवर चालला होता. वाटेत त्याने एका वृद्ध माणसाला अंजिराचे रोपटे लावत असताना बघितले. राजाने त्याला विचारले "म्हातारपणी कशाला एवढे श्रम करता ? तुम्हाला या वृक्षाची आहेत आपणास हजारो च फळे चाखायला मिळू शकतील का?" त्या वृद्धाने उत्तर दिले. "राजन ! मी जिवंत राहिलो तर मी स्वतः या वृक्षाची फळे खाऊ शकेन. मी मेलो तर माझे मुलगे, नातू अंजीर खातील." तीन वर्षांनंतर राजा पुन्हा एकदा त्याच रस्त्याने जात असता त्या वृद्धाने टोपली भरून अंजीर राजापुढे ठेवले व म्हणाला, “तीन वर्षांपूर्वी आपण म्हणाला होता की, या वयात मी एवढे परिश्रम घेता कामा नये. श्रमाची फळे किती मधुर असतात बघा !" राजाने आपल्या सेवकांना ती टोपली खाली करून घेण्यास व रिकामी टोपली सुवर्णमुद्रांनी भरून देण्यास सांगितले. वृद्ध जेव्हा सोन्याची मोहरांची टोपली घेऊन घरी आला तेव्हा त्याच्या शेजान्याला हे वर्तमान कळले. दुसऱ्या दिवशी शेजारणीने नवन्याला अंजिराची करंडी घेऊन राजाकडे जाण्यास सांगितले. राजाला सर्व प्रकार लक्षात आला. त्या माणसास धडा शिकविण्यासाठी राजाने ते अंजीर त्याला फेकून मारण्यास सुरुवात केली. घाबरून तो पळत सुटला व कसाबसा घरी आला. घरी आल्यावर बायकोने विचारले, "हे काय ! खाली हात आलात?" नवरा म्हणाला, “तुझे भाग्य थोर म्हणून मी वाचलो. अंजिराऐवजी नारळ असते तर त्यांच्या फेकण्यामुळे मी गतप्राणच झालो असतो! राजा परिश्रमाला बक्षीस देतो. अंजिराला नाही." परिश्रमांमुळेच मानवाचा महामानव होतो !

जून ०७, २०२१

संशोधन

                         संशोधन  



अल्बर्ट आईनस्टाईन यांना महान शास्त्रज्ञ म्हणून सर्व जग ओळखते. विज्ञानाच्या प्रगतीसाठी त्यांनी आपले सारे जीवन समर्पित केले. संशोधनाच्या आड येणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा त्यांनी लोभ धरला नाही. इस्रायल सरकारचे विख्यात शास्त्रज्ञ डॉ. बेजमैन यांचे निधन झाले. त्यांच्या जागी दुसरे कोण नेमायचे. याचा विचार चालू असता त्या उच्च पदासाठी आइन्स्टाईनसारखे दुसरे कोणीही लायक नाही, असे सर्वांचे एकमत झाले. आइनस्टाईनना ते पद स्वीकारण्यासाठी शासनातर्फे पत्र पाठविण्यात आले. दुसरा कोणी असता तर त्याने लगेच होकार दिला असता; परंतु आइनस्टाईन यांचे व्यक्तिमत्त्व काहीसे वेगळ्या प्रकारचे होते. ते अत्यंत निःस्पृह व निलोंभी होते. अभ्यास हाच त्यांचा ध्यास होता. त्यांनी सरकारला विनम्रपणे पत्र लिहिले, “आपण जो माझा सन्मान करीत आहात, त्याबद्दल आभारी आहे; परंतु इतक्या मोठ्या पदावर काम करणे मला दोन कारणांमुळे शक्य नाही. एकतर मी त्यासाठी तेवढा योग्य नाही व दुसरे म्हणजे शासकीय तंत्र सांभाळून मला कार्य करता येणार नाही. मी वैज्ञानिक असून प्रयोगशाळेत संशोधन करूनच मला समाधान व शांती प्राप्त होते. कृपया माझा हा अहंकार आहे, असे न समजता खरोखरंच, प्रयोगशाळेच्या बाहेर मी रममाण होऊ शकणार नाही." अणुक्षेत्रात क्रांती करणाऱ्या त्या धोर शास्त्रज्ञाने सर्वोच्च पदावर बसण्याचा लोभ झिडकारून संशोधन साधनाच चालू ठेवली.

जून ०७, २०२१

समभाव

                        समभाव 



एक सैनिक महत्त्वाच्या कामासाठी घोड्याला जोरजोराने पळवत नेपोलियनकडे आला. सेनापतीचा एक अतिशय महत्त्वाचा निरोप नेपोलियनला द्यायचा होता. निरोप तातडीचा असल्याने त्याने घोड्याला खूप वेगाने पळविले होते. त्या श्रमामुळे घोडा गतप्राण झाला. नेपोलियनने सेनापतीच्या पत्राचे उत्तर सैनिकाला लगेच दिले व म्हणाला, “तुझा घोडा मरण पावला आहे, तेव्हा तू माझा घोडा घेऊन ताबडतोब जा." सैनिक त्यामुळे संकोचून म्हणाला, “माझ्यासारख्या सामान्य शिपायाने आपल्या घोड्यावर स्वार होणे उचित नाही, मी पायीच जाईन.” असता; परंतु आ होते. ते अत्यंत होता. त्यांनी स सन्मान करीत पदावर काम त्यासाठी तेवढ मला कार्य क संशोधन करू अहंकार आहे रममाण होऊ शास्रज्ञाने साधनाच चा नेपोलियन उद्गारला, "नाही! नाही! असे होणार नाही! जगात अशी कोणती वस्तू आहे, की, जिच्यावर तुझा अधिकार नाही ? देशासाठी आपले प्राण समर्पण करण्यास तयार असलेल्या "तू अजून सैनिकापेक्षा या जगात दुसरी कोणती मौल्यवान गोष्ट आहे? माझा आहेत." घोडा मनात काहीही न आणता घे व सेनापतीला संदेश पोहोचव.” सैनिक अजूनही त्या श्रेष्ठ घोड्यवर स्वार होण्यास कचरत होता. नेपोलियन परत एकदा त्याला म्हणाला, “या जगात अशी कोणतीही असाधारण वस्तू नाही की, जिचा साधारण मनुष्य उपयोग करू शकत नाही. सर्व जण सारखेच आहेत. प्रत्येकाचे काम आपापल्या परीने श्रेष्ठ आहे.' सैनिकाने नेपोलियनचा घोडा घेतला व सेनापतीचे उत्तर त्याला देण्यासाठी लगेच तो निघाला.

मे २५, २०२१

मृदुता

                                         मृदुता



 प्रसिद्ध चिनी तत्त्वज्ञ कन्फ्यूशिअस म्हातारा झाला. त्याचे सर्व दात पडून गेले. एके दिवशी त्याने शिष्यांना आपले तोंड उघडून आत दात आहेत का, असा प्रश्न विचारला. शिष्यांनी उत्तर दिले, नाही'. त्यांनी शिष्य यांना परत तोंडा मधे पहावयास सांगितले आणि प्रश्न विचारला की, 'तोंडामधे जीभ आहे काय?' सर्वांनी मिळुन'होय' उत्तर दिले. 'जीभ आहे परंतु दात मात्र पडले आहेत,याविषयी कारण कोणी सांगू शकेल काय?' त्याने शिष्यांना विचारले. कोणीच शिष्य उत्तर देऊ शकला नाही. तेव्हा कन्फ्यूशिअस म्हणाला, 'जीभ तिच्या मृदुतेमुळे टिकून आहे; दात हे त्यांचे कठोरतेमुळे पडले.' ऋजुता किंवा मृदू स्वभाव जीवन सुंदर बनवतो, तर कठोरता, उद्धटपणा जीवनाला कुरूप बनवतो.

मे २५, २०२१

उदारता

                                      उदारता



        शेठ धनीराम नावाप्रमाणेच श्रीमंत होते. नम्रता, साधेपणा, उदारता, धार्मिकता अशा गुणसंपत्तीनेही त्यांचे जीवन समृद्ध होते. एकदा त्यांना एका विधवेची करुण कहाणी कळली. तिच्या घरात मिळवते कोणीच नव्हते. शेठ धनीरामने आपल्या सेवकाबरोबर तिच्या घरी खाण्यासाठी लाडू पाठविले. एका लाडूत त्यांनी एक सुवर्णमुद्रा टाकून ठेवलेली होती. मुलगा शाळेतून आल्यावर खाण्यासाठी त्याने तो लाडू फोडला; तर आत सुवर्णाची मुद्रा. त्याने आपल्या आईला ती दाखविली. आईने ती शेठधनीराम यांना नेऊन देण्याकरिता मुलांना बोलले. त्याप्रमाणे मुलगा त्यांच्या घरी गेला व ती सुवर्णमुद्रा परत केली. शेठजी त्या मुला बरोबर त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या आईला बोलले, “माई, मी मुद्दाम ती सुवर्णमुद्रा एका लाडूत टाकली होती. घरात अठरा विश्वे दारिद्र्य असतानाही तुझा प्रामाणिकपणा पाहून मी थक्क झालो आहे. या मुलाचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च मी करीन. तू अजिबात काळजी करू नकोस." शेठजींची ती अद्भुत उदारता व परोपकारी वृत्ती पाहून त्या मातेच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले.

Breaking