Breaking

सामान्य ज्ञान भाग - 5

 


इयत्ता सातवी सामान्य विज्ञान नोस्ट

 ९७. पालेभाज्या व फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ आढळतो.

९८. रेफ्रिजरेटरमध्ये 5°c तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही.

९९. मानवाच्या चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने मेंदू, चेतारज्जू, चेतातंतू असतात. 

१००. चेतासंस्थेचे मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिधीय चेतासंस्था असे दोन गट पडतात. 

१०१. मेंदू आणि चेतारजूंचा मध्यवर्ती चेतासंस्थेत समावेश होतो. 

१०२. चेतातंतूचा समावेश परिघीय चेतासंस्थेत असतो.

१०३. चेतातंतू निरनिराळ्या अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेशी संपर्क घडवून आणतात. 

१०४. शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम अपवाही चेतातंतू करत असतात. 

१०५. चेतासंस्था व चेतारज्जूंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहोचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात. 

१०६. काही क्रिया घडताना संदेश मेंदूपर्यंत न पोहोचता फक्त चेतातंतूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात.ह्याला प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणतात. 

१०७. अंत:स्त्रावी ग्रंथी वाहिनीहीन असलेचे उदा. पियूषिका, अवटू, अधिवृक्क, पाईनी, हृदोधिष्ठ हे आहेत.

१०८. सामान्यत: धातूंची ऑक्साइडस् आम्लारीधर्मी असतात. 

१०९. पाण्यात विरघळणार्या आम्लारींना अल्कली म्हणतात.

११०. सर्व अल्कली हे आम्लारी असतात, परंतु सगळे आम्लारी हे अल्कली नसतात. 

१११. उदासिनीकरणात क्षार आणि पाणी तयार होतात. 

११२. जेव्हा दाहक आम्ल व दाहक आम्लारी यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते त्या वेळी  क्षार उदासिन अंसतात. 

उदा. मीठ, सोडिअम नायट्रेट (NaNO) आहेत. आणि सोडिअम सल्फेट (Na,SO,) ही उदासिन क्षारांची उदाहरणे 

११३. दाहक आम्ल व सौम्य आम्लारीच्या रासायनिक अभिक्रियेतून मिळणारे क्षार आम्लधर्मी असतात. अॅल्युमिनिअम क्लोराईड, अमोनिअम सल्फेट हे क्षार आम्लधर्मी असतात. 

११४. दाहक आम्लारी आणि सौम्य आम्ल यातून मिळणारे क्षार हे आम्लारिघर्मी असतात. धुण्याचा सोडा (सोडिअम कार्बोनेट), बेकिंग सोडा (सोडिअम बायकार्बोनेट) हे क्षार आम्लारीधर्मी आहेत. 

११५. प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी. हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात. 

११६. लोणची, मुरांबा टिकविण्यासाठी अॅसेटिक आम्ल किंवा बेंझोइक आम्ल वापरतात. 

११७.मनुष्याच्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते. यामुळे अन्नपचन सुलभ होते. हे हायड्रोक्लोरिक आम्ल जास्त वाढले की अपचन होते. त्यावर उपाय म्हणून मॅग्नेशिअम हायड्रॉक्साइड सारखी आम्लारीधर्मी औषधे देऊन उपचार केले जातात.

११८. काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो म्हणून सौरचुलीतील भांड्यांना बाहेरुन काळा रंग असतो. 

११९. तापमापीमध्ये पाऱ्याऐवजी अल्कोहोल वापरता येईल. 

१२०. पाण्याची विशिष्ट उष्मा सर्वाधिक असल्यामुळे शीतक म्हणून मोटारीमध्ये आणि यंत्रामध्ये त्याचा उपयोग होतो. 

१२१. लघवीमधील साखरेमुळे मधुमेह या रोगाचे निदान होते. 

१२२. आरसा पुसल्याने त्यावर विद्युतभार तयार होतो म्हणून त्यावर लगेच धूळ बसते. 

१२३. शीतपेयातील सोडा आम्लारी वर्गात मोडतो.

 सामान्य विज्ञान - इयत्ता आठवी

१. सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहीत आठ ग्रह फिरतात, 

२. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. 

३. प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो. 

४. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात. 

५. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो. 

६. एकूण ८८ तारकासमूह मानले जातात त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत. 

७. प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे. 

८.प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात. 

९. बुधाचां परिभ्रमणकाळ फक्त ८८. दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ यर्षे इतका मोठा असतो. 

१०. बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे. 

११. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात. 

१२. पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात. 

१३. मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे. १४. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु 

१५.गुरुला एकूण ६३ उपग्रह आहेत. 

१६. शनी या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. 

१७. शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वतः भोवती परिवलन करतो. 

१८. धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरद्ध वाजूने असते. 

१९. हॅले हा धूमकेतू ७६ वर्षांनी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल. २०. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला. 

२१. त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना-१, एज्यूसॅट, भास्कर, इ. उपग्रह

शब्द मर्यादेमुळे पुढील पोस्ट मधे माहीती दिली जाईल धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking