Breaking

सामान्य ज्ञान भाग - 3

 




आपला प्रचंड प्रतिसाद बघुन  मागील पोस्ट सलग करत आहोत.

20. आयोडीन व नॅप्थालिन हे संप्लवनशील पदार्थ आहे. 

21. अमीबा, पॅरामोशिअम, क्लोरेलला हे एकपेशीय सजीव आहेत.

22. सजीवांची रचना आणि कार्य पेशीच्या पातळीवर होत असते. 

23. समान कार्य करणार्या पेशीच्या समूहाला उती असे म्हणतात. 

 24. उती पातळीवर संघटन असणारे सजीव मॉस, शैवाल, जलव्याल आहेत.

25. ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समुहाला इंद्रिय संस्था म्हणतात. 

26. प्राण्यांच्या किंवा वनस्पतींचा समूह ज्या विशिष्ट जागेत राहून विकसित होतो त्या जागेस अधिवास असे म्हनतात.

27. एकपेशीय जीवामध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होत असते. उदा. जीवाणू, क्लोरेला हे उदाहरन आहे.

28. कालिका पासून होणार्या प्रजननास कलिकायन म्हणतात. उदा. किण्व (यीसट) 

29. पुमंग हा नर घटक तर जायांग हा स्त्री घटक असतो. 

30. पुमंगातील परागकण जायांगाच्या कुक्षीवर पडल्यास ते रुजत असतात.त्यालाच परागण असे म्हणतात. 

31. अंड्यात वाढणारे जीवांना अंडज म्हणतात.आणि गर्भाशयातून जन्म घेणारे जिवांना जरायूज. 

32. सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे. चार कप्पे असतात. 

33. हृदयाकडून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्यांना धमन्या म्हणतात. 

34. शरीराच्या भागाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा म्हणतात. 

35. धमन्यांना फाटे फुटून त्या केसासारख्या होतात. त्यांना केशिका संबोधतात. 

36.अॅनेमिया, थॅलेसेमिया, कॅन्सर ग्रस्त रुग्णांना बाहेरुन रक्तपुरवठा केला जातो. 

37. अन्न घटकातील अमिनोआम्लाचा शरीरबांधणीसाठी उपयोग होत असतो.

38. अळूच्या पानात कॅल्शिअम ऑक्झॅलेटचे स्फटीक असतात. 

39. मूलद्रव्याच्या अतीसूक्ष्म कणाला अणू संबोधतात. 

40. पुढील मूलद्रव्यात दोन अणू असतात-ऑक्सिजन, हायड्रोजन, क्लोरिन, नायट्रोजन.

41. रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी अल्युमिनिअम, मॅग्नेशिअम है धातू आणि नायलॉन व फायबर ग्लास हे पदार्थ वापरतात. 42. 20 Hz ते 20000 Hz दरम्यानच्या वारंवारितेचा ध्वनी माणुस ऐकु शकतो. त्याला श्राव्य ध्वनी म्हणतात. 

43. अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वटवाघळाला वस्तूची जाणीव होत असुन मदत मिळते.

44. 20°C या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे 340 m/s होत असतो.

45. प्रकाशाचा वेग सुमारे 3 x 10 चा वर्ग 8 m/s एवढा आहे. 

46. अॅबरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात. 

47. काचेची दांडी रेशमी वस्वावर घांसल्यास धन विद्युतप्रभार निर्माण होतो. 

48. एवोनाईटची दांडी उनी कपड्यावर घासली की तिच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो. 

49. आकाशातील वीजेचा धोका टळण्यासाठी उंच झमारतीवर तडितवाहक बसवतात. 

50. छद्मपादाच्या सहाय्याने अमीबा पुढे सरकतो. 

51.स्वादुपिंडामधून इन्शुलिन स्त्रवते तर यकृतामधून पित्तरस स्ञवते.

52. शर्कसंचे प्रकार - फ्रुक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज, लॅक्टोज,इ.

53. प्रथिने ही मूलत: नायद्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत. 

54. प्रथिने शरीर बांधणीच्या कामात महत्वाची भूमिका बजावतात.

 55. आनुवांशिक गुणधर्मचे नियोजन करणारे डी-ऑक्सिरायबो न्युक्लिक आम्ल (DNA), रायबो न्यूक्लिक अॅसिड (RNA) हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत. 

56. 'अ' जीवनसत्वाच्या अभावी रातआंधळेपणा होतो.

 'ब' जीवनसत्वाच्या अभावी जीभ लाल, त्वचा रखरखीत, बेरीबेरी 

'क' जीवनसत्वाच्या अभावी हिरड्यातून रक्त येणे, स्कहीं

 'ड' जीवनसत्वाच्या अभावी मुडदूस, पाठीला बाक येणे, पायाची हाडे वाकणे. 

58. कॅल्शिअमच्या अभावी हाडे ठिसूळ बनतात. दातांची झीज होते. 

59. फॉस्फरसच्या त्रुटीमुळे वजनात घट होते व वाढ खुंटते.

60. लोहाच्या अभावामुळे पंडुरोग, रक्तक्षय (अॅनेमिया) हा विकार होतो. 

61. आयोडीनच्या अभावामुळे गलगंड (गॉयटर) हा रोग होतो. 

62. आपल्या मानेत असणान्या अवटू ग्रंथीमधून थायरॉक्झिन संप्रेरक स्त्रवते. 

63. प्राप्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणाऱ्या रासायनिक पदार्थांना संप्रेरके म्हणतात. 

64. जनुके पेशीच्या केंद्रकामध्ये सामावलेली असतात. उंची वाढण्यास कारणीभूत असलेले वृद्धी संप्रेरक मेंदू मधील फियुषिकेत तयार होते.

 65. किटकमक्षी वनस्पती - दवबिंदू (ड्रॉसेरा), घटपण्णी या आहेत. 

66. आम्ल - चवीला आंबट असतात. H हा मुख्य घटक असतो.

आम्लाच्या द्रावणात निळा लिटमस लाल होतो.

आम्लारी - चवीला तुरट असतात. OH हा मुख्य घटक असतो. आम्लारीच्या द्रावणात लाल लिटमस निळा होतो.

दर्शके- एखादा पदार्थ आम्ल किंवा आम्लारी हे ओळखण्यासाठी  वापरण्यात येणारे पदार्थ. उदा. लिटमस, हळद, मिथिलऑरेंज,फिनाॅल्प्थॅलिन

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking