Breaking

सामान्य ज्ञान भाग - 11

 


सामान्य विज्ञान नोट्स

१२१. ट्रवामध्ये विद्वाव्य क्षार विरघळला असेल तर त्याचा उत्कलनांक वाढतो. 

१२२. बाष्पीभवनाचा दर हा द्रवाच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाशी समप्रमाणात असतो. 

१२३. अभिसरणामुळे खारे वारे व मतलई वारे निर्माण होत असतात. 


१२४. विद्युत चुंबकीय तरगाच्या स्वरुपात व द्रव्य माध्यमाच्या शिवाय होणाऱ्या उष्णतेच्या स्थानांतरणास प्रारण असे म्हणतात. 

१२५. गोलीय आरसा ज्या गोलापासून बनविला आहे, त्या गोलाच्या केंद्रबिंदूला (C) आरशाचे वक्रता केंद्र असे म्हणतात. 

१२६. बहिर्वक्र आरशाला अपसारी आरसा असे संलबोधतात.

१२७. ज्या प्रतिमेतून प्रकाशाचे वास्तव अभिक्रमण होते व तेथून पुढे प्रकाश अपसूत होतो ती वास्तव प्रतिमा तर ज्या प्रतिमेतून प्रकाश अपसृत होण्याचा भास होतो ती आभासी प्रतिमा.

१३०. वाहनाच्या चालकासाठी बहिर्वक्र आरसा लावलेला असतो. 

१३१. बहिर्वक्र आरशाने वस्तूपेक्षा लहान सुलट प्रतिमा तयार होवुन दिसते. १३२. दाढी करताना आरसा हा अंतर्वक्र आरसा वापरला जातो. १३३. अंतवर्क आरशामध्ये सुलट व मोठी प्रतिमा दिसते त्यामुळे दाढी करणे सोपे होते.

१३४. प्रकाशाच्या आपतन दिशेतील सर्व अंतरे धन तर विरुद्ध दिशेतील अंतरे ऋण मोजतात.

१३५. वस्तू नेहमी आरशाच्या डाव्या बाजूला ठेवलेल्या जातात. म्हणजे प्रकाशाची अपतनाची दिशा डावीकडून उजवीकडे होईल.

१३६. आरशापासून वस्तूचे अंतर u व प्रतिमेचे अंतर v यांचे आरशाचे नाभीय अंतर आणि वक्रता त्रिजेशी संबंध दर्शविणारे सूत्र म्हणजेच आरशाचे सूत्र असते.

१३८. नेहमीच बहिर्वक्र आरशाने सुलट आणि आभासी प्रतिमा तयार होते.याची प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा लहान दिसते.

१३९. अंतर्वक्र आरशासमोर त्याच्या नाभीय अंतरापेक्षा कमी अंतरावर वस्तू ठेवल्यास तिची आभासी व सुलट व वस्तूपेक्षा मोठ्या आकाराची प्रतिमा दिसत असते.

१४०. वस्तूचे आरशापासूनचे अंतर नाभीय अंतरापेक्षा जास्त असेल त्यावेळी  आंतरर्वक्र आरशाने वास्तव व उलटी प्रतिमा तयार होत असते.

१४१. रशियाचा 'युरी गागारीन' हा अवकाशात जाणारा पहिला मानव होता, तर अमेरिकेचा नील आर्मस्ट्राँग' याने चंद्रावर सर्वप्रथम पाय ठेवला. १४२. स्वादुपिंड इन्सुलिनची निर्मिती करत असते.

१४३. अब्जांशी तंत्रज्ञान म्हणजे एक किंवा अधिक अणू , रेणू यांची रचना मांडणी करुन अत्यंत सूक्ष्म असे नवीन पदार्थ, आकार व उपकरणे तयार करने.

१४४. एक नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा अब्जावा भाग असतो.

     विज्ञान आणि तंत्रज्ञान class9 

१. हेलिअम (He), नियॉन (Ne), आरगान (Ar) यांच्या सारखे निष्क्रिय वायू किंवा राजवायू मुक्त अवस्थेत आढळून येतात. 

२. हायड्रोजन (H), ऑक्सिजन (0), क्लोरीन (CI), सोडियम (Na), मॅग्नेशिअम (Mg) इ. मुलद्रव्ये रेणू किंवा संयुगाच्या रुपात आढळतात. ३. राजवायूंच्या बाह्यतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन असून त्यांच्या बाह्यतम कक्षा पूर्णपणे भरलेल्या आहेत. त्या कक्षांना अष्टक म्हणतात. 

४. राजवायूंव्यतिरिक्त इतर सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. 

५. रासायनिक बदलात धातूंची इलेक्ट्रॉन देण्याची तर अधातूंची इलेक्ट्रॉन घेण्याची अथवा भागीदारी करण्याची प्रवृत्ती असते. 

६. ऋणभारीत इलेक्ट्रॉन दिल्यामुळे धनप्रभारित आयन तयार होतो. त्याला कॅटायन असे म्हणतात. इलेक्ट्रॉन दिल्यानंतर सोडियमच्या इलेक्ट्रॉनी संरुपणात बदल होऊन तो 

७. निऑन (Ne) या निकटतम निष्क्रीय वायूंचे स्थायी इलेक्ट्रॉनी संरुपण प्राप्त करतो. 

८. ऋणप्रभारित आयनास अॅनायन (Anion) असे म्हणतात. 

९. रेणूंमध्ये अणूंना एकत्र धरुन ठेवण्यास जी आकर्षण शक्ती जबाबदार असते त्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध म्हणतात. १०. एका अणूपाएून दुसऱ्या अणूकडे इलेक्ट्रॉनच्या स्थानांतरणामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात. 

११. Na व CI स्वतंत्रपणे धोकादायक असले तरी ल्यांचे संयुग मीठ (NaCI) सुरक्षित आहे. 

१२. सारख्याच किंवा एका मुलद्रव्यापासून तयार होणारी संयुगे दोन अणूंमधील देवघेवीमुळे तयार होत नाहीत, तर संयोग पावणाऱ्या अणूंमध्ये होणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे तयार होतात. या बंधाला 'सहसंयुज बंध' असे म्हणतात.

१३. जेव्हा रेणूमधील दोन अणूंमध्ये एकाच इलेक्ट्रॉन जोडीची भागीदारी होऊन बंध तयार होतो. त्या बंधाला एकेरी बंध असे म्हणतात. 

१४. मिथेन रेणूमध्ये C-H असे चार एते री बंध असतात. 

१५. जेव्हा रेणूच्या दोन अणूमध्ये दोन लेक्ट्रॉनच्या जोड्याची भागीदारी होते, तेव्हा ते वौन अणू दुहेरी बंधाने बांधले जातात. 

वरिल नोस्ट ची audio clip ऐकण्यासाठी यावरु क्लिक करा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking